पार्श्वभूमी:

IT शिक्षणाच्या क्षेत्रात MS-CIT च्या माध्यमातून १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा विक्रम करणाऱ्या MKCL मार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी MKCL Smart School हा एक शैक्षणिक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ग्रामीण, निम-शहरी, शहरी अशा सर्व भागातील शालेय विद्यार्थ्यांना रचनावादी शिक्षण अनुभव मिळावा यासाठी MKCL Smart School या अभिनव उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा समुचित वापर करून शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण-अनुभव मिळावा यासाठी MKCL Smart School ही एक सुयोग्य शिक्षण प्रक्रिया राबविली आहे.

MKCL Smart School ची उद्दीष्टे:

  • २१ व्या शतकाशी सुसंगत कौशल्यांची ओळख व विकासाला पोषक वातावरण उपलब्ध करणे.
  • विद्यार्थ्यांच्या कृतीशील सहभागाला अधिकाधिक प्रोत्साहन देणारे आव्हानात्मक शैक्षणिक वातावरण मिळणे.
  • मुलांच्या तंत्रविश्वाला समाविष्ट करून घेणारे शैक्षणिक वातावरण मिळणे.
  • मुले व पालक यांच्यातील सुसंवादाला पोषक वातावरण निर्माण होणे.

आमची भूमिका:

MKCL Smart School is PARAM School

Our Role

कोरोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शिक्षण क्षेत्रात, प्रामुख्याने शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे आपण अनुभवली. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना सर्व विषयातील आवश्यक संकल्पनांचे पूर्णतः आकलन झाले असे म्हणता येणार नाही. काहीजण यामध्ये मागेही राहिले. याचसाठी MKCL Smart School ची रचना विषयवार केलेली आहे. यामुळे विद्यार्थ्याला एखाद्या विषयातील संकल्पना सलगपणे समजून घेण्यास सोपे जाईल.

प्रत्येक विद्यार्थ्याला Learning through Assessment च्या माध्यमातून म्हणजेच प्रश्न सोडवून या संकल्पनांचे आकलन तपासता येणार आहे. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले म्हणजेच त्या संकल्पनेचे पुरेसे आकलन झालेले नसेल तर त्या प्रश्नानंतर Video स्वरुपात असलेले शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्याला उपलब्ध होईल. ज्ञान रचनावादी पद्धतीचा अवलंब करून तयार केलेले हे Video संकल्पना समजून घेण्यासाठी उपयोगी असतील.



MKCL Smart School - Enriching School Experience

View Offerings